बीड

बीड जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला

जिल्हाधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबरपर्यंत सुधारीत आदेश जारी

बीड (प्रतिनिधी)- शासनाच्या आज दि. 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार राज्यातील करोनाच्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सूचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बीड जिल्हयात 1 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.

• सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील.
तथापि, ऑनलाईन/ अंतराचे शिक्षणास परवानगी राहील.

चित्रपट गृह,जलतरणतलाव,करमणूक उद्याने,मॉल्स,बार,सभागृह,बंद राहतील,
• सर्व सामाजिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
• वय वर्ष 65 वरील व्यक्ती, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील.

• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी /मान्यता/ई-परवान्याची आवश्यकता नाही.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढीलप्रमाणे परवानगी राहील. टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर – फक्त अत्यावश्यक 1+ 3, रिक्षा – फक्त अत्यावश्यक 1+ 2, चार चाकी- फक्त अत्यावश्यक 1+3, दोन चाकी – 1 + 1 मास्क व हेल्मेटसह. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.
सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
खुल्या जागेत व्यायामास परवानगी देण्यात आली आहे,