उद्यापासून पितृपक्ष सुरू:पितृ दोषातून मुक्तीआणि पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय
मुंबई: पितृपक्ष येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पितृपक्षात पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार पितृपक्षात तर्पण केल्याने आणि दान-पुण्याचे विधान असते. हिंदू धर्मात पितृपक्षाला मोठे महत्त्व आहे. ज्याप्रमाणे देवांची पुजा केली जाते त्याचप्रमाणे या पक्षात पूर्वजांची पुजा केली जाते. जर पूर्वज नाराज असतील तर मनुष्याला खूप कष्ट उचलावे लागतात. अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये पितृ दोष असतो. जर पितृ पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास हे दोष संपू शकतात. जाणून घ्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत.
जाणून घ्या कशी मिळवाल पितृ दोषातून मुक्ती आणि पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय
पितृ पक्ष सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही पितरांना जल अर्पण करा. या पाण्यात जव आणि काळे तीळसोबत एक लाल फूलही अर्पण करा. हे जल दक्षिण दिशेला तोंड करून दुपारच्या सुमारास अर्पण केले पाहिजे. यामुळे केवल पितरे प्रसन्नच होत नाहीत तर यामुळे पितृदोष कमी होतात.
पितृ पक्षात जेव्हा तुमच्या पितरांची मृत्यू तिथी असेल त्या दिवशी ब्राम्हण, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांना जरूर भोजन द्या. यासोबतच गरिबांना अन्न-धान्य आणि गरजेच्या वस्तूंचे दान करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल. दान केल्याने सरळ पितरांना या गोष्टी मिळतात.
पितृ पक्षाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत पितरांच्या नावाने श्रीमदभगवत गीता आणि गरूड पुराणाचे पठण करा. यामुळे पितरांना शांती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात.
जर तुम्हाला पितरांच्या मृत्यू तिथीबाबत माहिती नसेल तर तुम्ही पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घाला. या दिवशी श्राद्ध घातल्यास तुम्ही पितृ दोषातून मुक्ती मिळवू शकता.
जर तुमच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पितरांना तीळ, जवस आणि लाल पुष्प अर्पण का. यासोबतच ब्राम्हण अथवा गरिबांना दान पुण्य मिळवले पाहिजे.
पितृ पक्षात कावळे आणि मुग्यांना रोज खाणे दिले पाहिजे. पितृ पक्षात आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात धरतीवर येतात.
प्रत्येक अमावस्येला एक नारळ फोडा आणि यातील एक हिस्सा आपल्या पितरांच्या नावावर ठेवून त्यावर मिठाई ठेवा आणि यासोबत कपूर जाळा. हा पितृदोषावरील सगळ्यात असरदार उपाय आहे.
पितृपक्षामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे दान करावे. यामुळे पितरांना शांती मिळतेच मात्र त्याचबरोबर आशीर्वादही मिळतात