देशनवी दिल्ली

केंद्राची नियमावली जाहीर:सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी

करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय यासह धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र केवळ शंभर लोकांनाच यात सहभागी होता येणार आहे