कितीही अडथळे आले तरी देखील कामे पूर्ण होणारच- डॉ. भारतभूषण क्षीरसागर
मुख्य रस्त्यासोबत होणार अंतर्गत रस्ते आणि नाली
(प्रतिनिधी) बीड शहर वासीयांना जी काही विकास कामे करण्याचा शब्द दिला आहे ती सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, विकास कामात कितीही अडचणी आल्या तरी देखील कामे होणारच असल्याचा विश्वास नागराध्यक्ष डॉ.भरतभूषण क्षीरसागर यांनी पिंपरगव्हान रोड मुख्यरस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला
शनिवारी शहरातील पिंपरगव्हाण रोडवरील मुख्य सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. यावेळी दिलीपराव गोरे,न.से. भास्कर जाधव, न.से.किशोर पिंगळे, शशिकांत जाधव, सुभाष सपकाळ, शिवाजी मुंढे,ईंजी.शशीकांत चव्हाण,प्रमोद पुसरेकर,नागेष तांबारे,पिंटू माने,संजय वाघमारे,अमोल बागलाने, संतोष शेळके,ठाकुर,मुन्ना गायकवाड,राजु बागडे, संदिप नवले संजय कुलकर्णी,रामहरी शेळके,साळुंके यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
पिंपरगव्हाण रोड दर्जेदार सिमेंट रोड करावा ही गेल्या अनेक दिवसांची मागणी या भागातील नागिकांची होती, या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कॉलोनी झाल्या आहेत, रस्ता खराब असल्याने मोठ्या अडचणींचा सामना या भागातील नागरिकांना कारवाया लागत होता ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यरस्ता सिमेंट काँक्रिट करण्यासाठी निधी उपलब्ध करून आज शनिवार रोजी या कामाचा शुभारंभ कोणताही गाजावाजा न करता केला. तात्काळ कामाला सुरुवात झाल्याने या भागातील नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी या भागातील रहिवाशी यांनी नगराध्यक्ष डॉ भरतभूषण क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या भागातील रस्ते नाली च्या समस्या सांगताच या रोडवर असणारया सर्वच अंतर्गत कॉलोनीतील रस्ते आणि नाली तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत असून नागरिकांनी वेळोवेळी साथ दिली आहे, त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे, पण हे कर्तव्य पार पाडत असतांना कितीही अडथळे आले तरी देखील विकासकामे करण्याचा आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून कामे पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत कामे करणारांच्या पाठीशी खंबीरपणे साथ द्यावी असेही ते म्हणाले.