विशेष वृत्त

होम लोन घेणाऱ्यांसाठी मोठी संधी:असे आहेत 11 बँकांचे व्याजदर

बरेच लोक घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. जर आपणही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला निश्चितपणे व्याज दर बघाल. सध्याच्या कोरोना काळात घसरलेल्या व्याजदरात स्टेट बँक ऑफ इंडियाआणि एचडीएफसी लिमिटेड यांच्यासह जवळपास सर्वच बँकांनी होम लोनचे दर कमी केलेले आहेत. काही बँकांचे दर हे 7 टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत, जे होम लोन घेणाऱ्यांसाठी मोठी संधी ठरू शकते. कोणत्या बँका या वर्षाकाठी 7 टक्क्यांपेक्षा कमी व्याज दराने होम लोन देत आहेत ते जाणून घेऊयात.

‘ही’ बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन
यूबीआयने होम लोनवरील व्याज दर हे 6.7 टक्क्यांनी कमी केले आहे. यूबीआयचे होम लोन व्याज दर ईबीएलआरशी जोडला गेला आहे.
लक्षात ठेवा की, या कमी व्याज दरावर होम लोन केवळ अशा ग्राहकांनाच उपलब्ध असतील ज्यांचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा जास्त आहे. केवळ यूबीआयमध्ये काम करणार्‍या महिलांना ज्यांचा सिबिल स्कोअर हा 700 पेक्षा जास्त आहे त्यांना 6.73 टक्के दराने होम लोन मिळेल. बँकेत काम करणाऱ्या पुरुषाला 6.75 टक्के दराने होम लोन मिळेल. याशिवाय नॉन-सॅलराईड व्यक्तीलाही 6.90 टक्के दराने होम लोन मिळेल.
या बँकांमध्ये होम लोनवर सर्वात कमी व्याज दर मिळत आहेत
बँक ऑफ बडोदा – 6.85 टक्के
बँक ऑफ इंडिया – 6.85 टक्के
सेंट्रल बँक – 6.85 टक्के
कॅनरा बँक – 6.90 टक्के
पंजाब आणि सिंध बँक – 90.90 टक्के
यूको बँक – 6.90 टक्के
एचडीएफसी लिमिटेड – 6.90 टक्के
एचडीएफसी बँक – 6.95 टक्के
एसबीआय – 6.95 टक्के
आयसीआयसीआय बँक – 6.95 टक्के
पंजाब नॅशनल बँक -7 टक्के

लोन घेताना या गोष्टी लक्षात घ्या
होम लोन घेताना फक्त कमी व्याजदराकडेच लक्ष दिले गेले नाही पाहिजे. व्याज दराखेरीज, आपल्याला लेंडर्सची विश्वासार्हता तसेच इतर काही शुल्काची देखील तपासणी करावी लागेल, जे प्रत्येक बँके नुसार वेगवेग;ळे असू शकतील. क्रेडिट स्कोअरमध्ये बदल झाल्याबरोबर रिस्क प्रीमियम देखील बदलतो. म्हणूनच, जर तुम्ही होम लोन घेतले असेल तर क्रेडिट कार्ड भरण्यात उशीर करण्यासारखा निष्काळजीपणा तुमच्यावर होम लोन ईएमआयचा बोजा वाढवू शकते. म्हणूनच, आपल्या क्रेडिट स्कोअरची दर तीन महिन्यांनी तपासणी करत रहा.