आज पर्यंतची सर्वात चांगली बातमी:305 रुग्ण घरी परतणार
आज एकाच दिवसात बरे होणाऱ्या पेशंटचे त्रीशतक झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांला मोठे यश मिळत आहे ही परिस्थिती राहिली तर काही दिवसातच बीड जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो
आज शनिवारी जिल्ह्यातील 305 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे
त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 3041 झाली आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज 305 रुग्णांना सुटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आहेत.जिल्ह्यातील बाधीत संख्या 4373 असून 1213 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे
उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्यांची संख्या 75 टक्के झाली आहे आज परळीचे 100 रुग्ण घरी परतणार आहेत