कोरोनापासून बचावासाठी ‘इम्युनिटी’ फायदेशीरच:त्यासाठी उपाय !
मुंबई | जगभरात या कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात होणाऱ्या मृत्यूची संख्याही लक्षणीय आहे. आता यावर उपाय म्हणून कोरोना लसीकडे बघितले जात आहे.
कोरोनासाठी फक्त एकच उपाय म्हणून लसीकडे बघितले जात आहे, पण यापेक्षाही एक वेगळा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या शरीरातील इम्युनिटी.
अनेक डॉक्टरांनी कोरोनापासून बचावासाठी ‘इम्युनिटी’ फायदेशीर ठरेल असा दावा केला आहे. तुमच्या शरीरात कोरोनाचा शिरकाव जरी झाला तरी तुमची इम्युनिटी तुमचा बचाव करू शकते.
जाणून घ्या आता तुम्ही तुमच्या शरीरातील इम्युनिटी कशी वाढवाल :-
योगा, व्यायाम, खेळ, घरचे जेवण, आवळा खाल्ल्याने तुमची इम्युनिटी वाढू शकते
तसेच तुम्ही वेगवेगळे फळे, डाळी, हिरव्या भाजेपाल्या, दूध, दही, तूप,लस्सी, अशा अनेक पदार्थांमुळे तुमची इम्युनिटी तुम्हाला वाढवता येणार आहे.
या गोष्टींपासून लांब रहा यामुळे तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते :-
मैद्याने बनलेले पदार्थ, जंक फूड, कोल्ड्रिंक्स, कचोरी, समोसे, पाव भाजी, बाहेर बनवलेले तेलकट पदार्थ, या गोष्टी जास्त खाल्ल्याने तुमच्या शरीरावर याचा परिणाम होत असतो. तसेच यामुळे तुमच्या शरीरातील इम्युनिटीही कमी होते.