राज्यातील गावठाणाची मोजणी पूर्ण:700 गावांतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड
पुणे – राज्यातील सुमारे 1 हजार 165 गावांतील गावठाणांची मोजणी भूमि अभिलेख विभागाने ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली आहे. ड्रोनमुळे केवळ तीन वर्षात हे काम पूर्ण झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडीयाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात होता.
राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता
राज्यात जमिन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले.
20 ड्रोनच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 1 हजार 162 गावांच्या गावठाणाची मोजणी आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी 700 गावांतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली