पुणे

राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासासाठी वैध फास्टॅग अनिवार्य

नवी दिल्ली – टोल नाक्यावरील परतीच्या प्रवासातील सूट किंवा इतर कोणतीही सूट मिळविण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग अनिवार्य केला आहे. 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करताना ज्या वाहनचालकांना सवलत हवी असेल किंवा इतर कोणतीही स्थानिक सूट हवी असेल, त्यांनी वाहनात वैध फास्टॅग लावणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे. अशा सवलतीसाठी देय शुल्क प्री-पेड इन्स्ट्रुमेंट्स, स्मार्ट कार्ड किंवा फास्टॅग किंवा बोर्ड युनिट (ट्रान्सपॉन्डर) किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटद्वारे दिले जाईल.

यामुळे 24 तासांच्या आत परतीच्या प्रवासावरील सूट फास्टॅग किंवा इतर अशा उपकरणांद्वारे दिली जाईल, कोणत्याही पासची आवश्यकता भासणार नाही.
अशा परिस्थितीत पूर्व पावती किंवा नोटीसची आवश्यकता नाही.

जर वाहनावर वैध फास्टॅग असल्यास त्या वाहनाने 24 तासांत परतीचा प्रवास केला असेल तर नागरिकांना आपोआप सूट मिळेल.