कोरोनाग्रस्तांचे आत्मबळ वाढवणारा देवदूत
बीड- कोरोनाच्या भयंकर परिस्थिती मध्ये जनतेच्या सेवेत राहून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोरोना ग्रस्तांना आधार देत प्रत्येकाची काळजी घेत या संकटातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे, रुग्णाना आवश्यक मदत अन धीर देण्याचे काम क्षीरसागरांनी केले, कोरोनाग्रस्तांचे आत्मबळ वाढवणारा देवदूत म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी जिवाभावाचा नेता म्हणून त्यांना धन्यवाद दिले आहेत
कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून प्रत्येक जण अडचणीत आला आहे,अनेकांना या संकटात आधार शोधावा लागला हजारो गोरगरीब आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेला आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची गरज भासू लागली त्यातच स्वतःला व आपल्या नातेवाइकांना कोरोनाची लागण झाल्यावर तर सामान्य नागरिक सैरभैर झाले होते पण आपला नेता नक्कीच आपल्या या संकटात धावून येणारा आहे हा आत्मविश्वास त्यांच्या मनात होता आणि तो खराच ठरला,तीन ते चार महिन्यापासून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होते,आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते,सुखदुःख जाणून घेत होते,दररोज दुपारी 1 ते 6 त्यांनी स्वतःच्या कार्यालयांत राहून आणि वेळप्रसंगी थेट रुग्णालयात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम केले, कोरोनाच्या संकटात प्रत्येकाला मदत कशी करता येईल हा एकमेव विचार करत त्यांनी जमेल ती मदत केली बीड मध्ये असो , मुंबईत असो की औरंगाबाद मध्ये तिथेही प्रत्येक डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी सतत संपर्क ठेवला यातून शेकडो कार्यकर्त्यांना व त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार मिळाला
राजकारणात कार्यकर्त्यांना जपावेच लागते पण माणुसकी म्हणून राजकारणाच्या व्यतिरिक देखील ही कामे करावी लागतात हे जयदत्त क्षीरसागर यांनी दाखवून दिले आहे नुसते आश्वासन देऊन चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून ते करावे लागते जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि आपल्या माणसाची काळजी घेणारा हा नेता प्रत्येकासाठी देवदूत म्हणून धावून आला आहे ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते आजही आपल्या या नेत्याच्या या कार्याचे अनुभव बोलून दाखवत आहेत 24 तास जनतेच्या सेवेत राहून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडकरांना जो आधार दिला त्याचे नक्कीच भविष्यात चांगले फलित मिळेल अशीही भावना व्यक्त होऊ लागली आहे