विशेष वृत्त

आज दुपारी 1.59 नंतर गौरी आवाहन-पंचांगकर्ते दाते

आज (दि.25) अनुराधा नक्षत्रावर दुपारी 1.59 नंतर गौरी आवाहन करता येईल, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले आहे. ज्येष्ठा नक्षत्र, मध्यान्ही असलेल्या दिवशी गौरींचे पूजन करतात.

बुधवारी (दि.26) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करण्यात येते. गुरुवारी (दि.27) दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनासाठी ठराविक वेळेची मर्यादा नसते. पण यावर्षी आवाहन व विसर्जनासाठी मर्यादा दिलेली असून, त्या मर्यादेत कधीही आवाहन व विसर्जन करता येईल, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.