बीड जिल्ह्यात आज 108 घरी गेले तर 82 कोरोना पॉझिटिव्ह आढळले
आज दि 22 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर आजच 108 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे
बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3744 झाला असून आतापर्यंत 1935 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 88 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1721 असून यामध्ये 1415 रुग्ण हे लक्षणें नसलेली असून सौम्य लक्षण असलेली 241 रुग्ण आहेत तर मध्यम लक्षणे असलेली 47 आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 18 रुग्ण आहेत
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
आत्तापर्यंत 50264 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 46520 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 51.68 इतका असून एकूण संख्येच्या 7.2 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे,सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेली असून त्यामुळे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे