जिल्ह्यात 3 शहरातअॅन्टिजेन टेस्टमध्ये 172 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यातील 3 शहरामधील व्यापा-यांच्या रॅपिड अॅन्टिजेन टेस्टची मोहिम आजही राबवण्यात आली या शहरामध्ये झालेल्या रॅपिड अॅन्टिजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 2148 जणांची टेस्ट घेण्यात आली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचे सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी 3 शहरामध्ये व्यापा-यांच्या रॅपिड अॅन्टिजेन टेस्टची घेण्यात आली यात परळी, माजलगाव, अंबाजोगाई या 3 शहरामध्ये ही मोहिम राबवली
आज एकुण 2148 जणांची अॅन्टिजेन चाचणी झाली. त्यात 172 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. परळी शहरामद्ये झालेल्या 819 जणांच्या चाचणीमध्ये 76 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.अंबाजोगाईत 963 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यात 30 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर माजलगाव मध्ये 366 टेस्ट घेण्यात आली त्यात 66 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.