बीड

बीड जिल्ह्यात आज दोन्ही टेस्टमध्ये तब्बल 269 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले व नवीन अश्या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यात आज 39 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आजच अँटिजेंन टेस्ट मध्ये 230 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे दोन्ही टेस्टच्या अहवालात एकूण 269 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे

बीड जिल्ह्यात कोरोनाचे सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी पाच शहरामध्ये व्यापा-यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची मोहिम राबवली जात आहे. पहिल्या दिवशी पाच शहरात 210 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आज दुस-या दिवशी माजलगाव शहरातील काही कारणास्तव अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाली नाही. मात्र उर्वरित परळी, केज, अंबाजोगाई आणि आष्टी या चार शहरामध्ये ही मोहिम राबवल्या गेली. एकुण 6330 जणांची अ‍ॅन्टिजेन चाचणी झाली. त्यात 230 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. परळी शहरामद्ये पंचायत समिती, नटराज रंग मंदिर, बसस्थानक आणि सरस्वती विद्यालयाच्या बुथवर झालेल्या 2032 जणांच्या चाचणीमध्ये 105 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. केजमध्ये 607 व्यापा-यांची आज तपासणी झाली त्यात 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अंबाजोगाईत 2091जणांची टेस्ट करण्यात आली. त्यात 46 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर आष्टीत 600 जणांच्या तपासणीत 33 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.