बीड जिल्ह्यात आज 228 घरी गेले तर 290 कोरोना पॉझिटिव्ह परत आले
आज दि 18 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 78 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर आजच 228 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे आज 579 जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तर अँटिजेंन टेस्ट मध्ये 5756 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यात 212 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामध्ये अंबाजोगाई 37,आष्टी 17,केज 20,माजलगाव 71,तर परळीत 67 जण पॉझिटिव्ह आलेत
बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2682 झाला असून आतापर्यंत 1473 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या 1338 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 71रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण जिल्ह्यात 290 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत