पुणे

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार ढाकणे यांची पोलीस तक्रार प्राधिकरणावर नियुक्ती !

पुणे : शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार ढाकणे यांनी राज्य पोलीस प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे. या प्राधिकरणाला घटनात्मक दर्जा असून ह्या प्राधिकरणावरील सदस्याला संवैधानिक दर्जा असतो. या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असून प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतात. या प्राधिकरणात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाते. साक्षीदारांना समन्स पाठविणे त्यांना हजर राहण्यास भाग पाडणे आदी विविध अधिकार या प्राधिकरणाला आहेत.
राजकुमार ढाकणे हे शहरातील विश्रांतवाडी या भागातील रहिवासी असून नगर रोड भागात येणाऱ्या जवळपास सर्वच भागात आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे ते परिचित आहेत. ढाकणे हे मागील १७ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शाखा अध्यक्ष पदापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आदींच्या अतिशय निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये ढाकणे आहेत.
राजकुमार ढाकणे हे उच्चशिक्षित तरुण असून एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील उद्योग क्षेत्रात त्यांची ओळख आहे. देश – विदेशात देखील केलेल्या अभ्यास दौऱ्यामुळे ढाकणे यांची परराष्ट्र अभ्यासक म्हणून देखील ओळखले जाते.
ढाकणे यांनी त्यांच्या राजकुमार ढाकणे फाऊंडेशन च्या वतीने लॉकडाऊन च्या कालावधीत पुणे शहरातील येरवडा, गांधीनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, जयप्रकाश नगर आदी भागांमधील गरजू नागरिकांना मोफत धान्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन कालावधी मध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज तसेच covid-19 प्रोफीलक्सिस असॆर्निक अल्बम 30C औषधांचे पॅकेट्स चे मोफत वाटप केले होते. संविधानाला सर्वस्व मानून राजकुमार ढाकणे हे विविध बहुजन समाजाच्या चळवळीत देखील अग्रेसर असतात.
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर झालेल्या नियुक्ती बद्दल राजकुमार ढाकणे यांचे पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्र, बहुजन चळवळीतून स्वागत केले जात आहे.