बीड

बीड जिल्ह्यात आज 108 कोरोना पॉझिटिव्ह

आज दि 17 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2571 झाला असून आतापर्यंत 1243 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 75 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1257असून यामध्ये 942 हे लक्षणें नसलेली रुग्ण असून रुग्ण सौम्य लक्षण असलेली 269 रुग्ण आहेत तर मध्यम लक्षणे असलेली 30 आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 16 रुग्ण आहेत

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
आत्तापर्यंत 32382 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 29811 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 48.34 इतका असून एकूण संख्येच्या 8.3 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे,सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेली असून त्यामुळे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे

error: Content is protected !!