देशनवी दिल्ली

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1 जुलैपासून ATM पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना (Saving Account Holders) ATMमधून एका महिन्यात 8 वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते.

SBI आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य पैसे काढण्याची परवानगी देते. यामध्ये SBI 5 ATMमधून विनामूल्य व्यवहार आणि इतर कोणत्याही बँकेतून तीनवेळा पैसे काढू शकतो.
इतर शहरांमध्ये 10 वेळा ATM मधून पैसे काढू शकता. त्यापैकी एसबीआयमधून पाचवेळा, तर इतर बँकांच्या ATMमधून पाचवेळा. बॅंक खात्यात सरासरी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बचत खातेधारक स्टेट बँक ग्रुप (SBG) आणि अन्य बँकांच्या ATM वर अमर्याद व्यवहार करण्यास परवानगी देतात.

ATM ट्रॅन्झॅक्शन चार्ज

अकाउंटमध्ये जास्त रक्कम नसल्यामुळे जर ट्रॅन्झॅक्शन फेल झाले, तर एसबीआय खातेधारकांकडून 20 रुपये फीसह जीएसटी घेईल.

OTP सह काढू शकता ATM मधून रक्कम

10 हजार रुपयांहून अधिक ATM मधून पैसे काढण्याचे नियमही बदलले आहेत. आता जर तुम्ही SBIच्या ATM मधून दहा हजाराहून अधिक रुपये काढले तर तुम्हाला OTP ची आवश्यकता भासेल. ही नवीन सुविधा 1 जानेवारी 2020 पासून अंमलात आली आहे. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेदारांना SBIच्या ATM मधून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल.