विक्रेत्यांना दिलासा:श्रीगणेश मुर्ती घरपोच विक्री करण्यासाठी परवानगी
बीड-अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव सणानिमित्त नागरिकांना श्री गणेश मूर्ती मिळाव्यात यासाठी प्रशासनाने मूर्ती घडवणारे व विक्री करणारे यांना दि 22 ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊनमधून सूट दिली असून आता नागरिकांना घरपोच गणेश मूर्ती मिळणार आहेत ही परवानगी देण्यात आल्याचे आदेश प्रविणकुमार धरमकर अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत
मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जाऊन त्यांचे मातीचे बनवलेले बैल व श्री गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉक डाऊन कालावधी मध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत सूट देण्यात येत असून बीड गेवराई शिरूर कासार आष्टी पाटोदा माजलगाव धारूर वडवणी केज अंबाजोगाई परळी या शहरातील अशा विक्रेत्यांनी आपापल्या शहरातील शासकीय रुग्णालयात दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता स्वतःची अँटिजेंन टेस्ट करून घ्यावी ज्या विक्रेत्यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी अँटिजेंन टेस्ट करणे शक्य होणार नाही त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट रोजी अँटिजेंन टेस्ट करून घ्यावी सर्व विक्रेत्यांनी टेस्ट साठी जाताना स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे तसेच सर्व नागरिकांनी अशा विक्रेत्यांची तपासणी झाली असल्याची खात्री करूनच बैल आणि गणेश मूर्ती खरेदी कराव्यात असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे