बीड

बिंदुसरा धरण भरले;नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले जलपूजन

बीड -शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण 99 टक्के भरले असून यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.आज नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास व्यक्त केला आहे

आज बीड नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरण 99 टक्के भरले असल्याने या ठिकाणी जाऊन श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले.
पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष यांनी केले.
नदीकाठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आली सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.तसेच आगामी काळात बीड शहराला पिण्याचे पाणी मुबलक मिळेल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास व्यक्त केला आहे योग्य नियोजन करून पाणी पुरवठा केला जाईल असेही त्यांनी सांगितले
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉउत्कर्ष गुट्टे पाणीपुरवठा सभापती रवींद्र कदम नगरसेवक गणेश वाघमारे यांच्यासह नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना परिस्थिती असल्याने शासनाचे नियम पाळून हा जल पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.