कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पण पुन्हा पॉझिटिव्ह होतो का !पहा संशोधकांच मत
कोरोना जगभरात थैमान घालत आहे. आता कोरोनावरील रशियाची लसही आरोग्यसेवकांना देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीबाबत अनेक देशांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हिंदुस्थानसह इतर देशांच्या लसीही अंतिम टप्प्यात आहेत.
तसेच कोरोना रोखण्यासाठी आणि हा नेमका कसा परसतो,याची माहिती घेण्यासाठी विविध संशोधन करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्यानंतरही त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते काय, असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात कोरोनामुक्त झालेल्यांना तीन महिने तरी पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात अॅण्टीबॉडी बनण्यास सुरुवात होते, असे संशोधकांनी सांगितले. या अॅण्टीबॉडीमुळे रुग्ण कोरोनामुक्त होतो. तसेच या अॅण्टीबॉडी शरीराचे कोरोना व्हायरसपासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांना काही महिनेतरी कोरोना संक्रमणाचा धोका नसतो. या अॅण्डीबॉडी शरीरात असेपर्यंत कोरोनापासून बचाव होतो. अॅण्टीबॉडीमुळे शरीरात कोरोना व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे हॉवर्ड विद्यापीठातील इम्यूनोलॉजिस्ट डॉ. मायकल मीना यांनी सांगितले. तसेच या अॅण्टीबॉडी शरीरात दोन ते तीन महिने राहत असल्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.
काही रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना तीन महिन्यातच पुन्हा कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अभ्यास केला असता एखाद्या कोरोनाबाधितावर पूर्ण उपचार झाले नाहीत किंवा तो पूर्णपणे बरा झाला नाही, असे रुग्ण असल्यास त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असावी, असे संशोधकांनी सांगितले. शरीरात अॅण्टीबॉडी तयार झाल्या असल्यास कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन ते तीन महिने पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.