बीड

आज जिल्ह्यात 98 कोरोना रुग्णांची भर 106 जणांना सुट्टी

आज जिल्ह्यात 98 कोरोना रुग्णांची भर 106 जणांना सुट्टी

बीड : जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट झाली आहे तर मृत्यू दर देखील कमी झाला आहे आजच्या अहवालात 98 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असली तरी 106 जण बरे झाले आहेत

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2319 वर गेली आहे, कोरोनाची संख्या वाढली असली तरी यातून बरे होण्यार्‍या रूग्णांची संख्याही मोठी आहे. आज कोरोनामुक्तचा आकडा शतक पार केला आहे. जिल्ह्यातील तब्बल 106 रूग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये बीड 14, आष्टी 5, पाटोदा 1, गेवराई 32, माजलगाव 6, धारूर 2, केज 11, अंबाजोगाई 6, परळी तालुक्यातील 29 असा 106 जणांना आज शुक्रवारी सुट्टी देण्यात देण्यात आली आहे. 1271 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 969 बरे झालेले आहेत. तर 59 जणांचा मृत्यू झालेला आहे