आ सुरेश धस सेल्फ होम क्वारंटाईन;नागरिकांना केले आवाहन
आष्टी- भाजपा आमदार सुरेश धस हे कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आले असल्यामुळे ते स्वतःक्वारंटाईन झाले आहेत त्यांनी स्वतः नागरिकांना आव्हान करून हे सांगितले आहे
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वतः आज विलगीकरनात जात (होम क्वारंटाइन) आहे तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईल वर चोवीस तास उपलब्ध असून माझे सहकारी देखील सदै व आपल्या सेवेसाठी तत्पर असतील आपण देखील आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या घरातच रहा सुरक्षित रहा असे आव्हानही आमदार सुरेश धस यांनी केले आहे