बीड

रेल्वे व महामार्ग साठी संपादित केलेल्या जमिनीचे मावेजा प्रकरणे तात्काळ निकाली काढा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 211 तसेच अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग आणि इतर शासकीय कामासाठी ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या जमिनीच्या मावेजा चे प्रकरण तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा तसेच सध्याच्या काळात अँटिजेंन टेस्टसाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे

मंगळवारी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 211 तसेच नगर बीड परळी रेल्वे मार्ग व शासकीय कामासाठी ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना अद्यापही मावेजा मिळालेला नाही याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे बीड जिल्ह्यात अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्याची सुनावणी बाकी आहे ही सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येते त्यामुळे ही प्रकरणे तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा अनेक महामार्गावरील शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळावा यासाठी अपील दाखल केले आहे आठ वर्षापासून ही प्रकरणे प्रलंबित असून नगर बीड रेल्वे च्या जमिनीची प्रकरणे सुद्धा प्रलंबित आहे ती निकाली काढून शेतकऱ्यांना मावेजा चे वाटप करण्यात यावे तसेच सध्या कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी आणि ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेंन टेस्ट जागेवर करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध झाल्यास जनतेच्या दृष्टीने ते सोयीचे होईल आणि कोणाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल नागरिकांकडून अँटिजेंन टेस्टसाठी मागणी आल्यास थेट मोबाइल व्हॅन च्या माध्यमातून ती टेस्ट घेतली जावी त्यामुळे होणारा संसर्ग वाढणार नाही अशी सूचना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन केली आहे