आज डिस्चार्ज घेऊन 74 जण होणार कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात रुग्ण वाढीची संख्या अधिक असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे आज 74 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे
बीड जिल्ह्यात 2252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये 917 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या 1276 रुग्ण उपचार घेत असून आज 74 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचीअँटिजेंन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये आढळून आलेल्या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत लक्षणें असणाऱ्या या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे याचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे नागरिकांनी आता सूचनांचे पालन करावे आणि कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यात 11 ठिकाणी रुग्णालयात बाधितांचा उपचार सुरू आहे सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये आहेत त्यानंतर परळीत आहेत