महाराष्ट्रमुंबई

सरकारचा इशारा;चुकूनही असे आलेले कॉल्स घेऊ नका बँक खाते होईल हॅक

मुंबई-ऑनलाईन आणि मोबाईल फ्रॉडची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडलने CyberDost वर यूजर्सना याचा इशारा दिला आहे. फेक कॉल्स विषयी सरकारने यूजर्सना अलर्ट केले आहे, या कॉल्स च्या मदतीने त्यांना लक्ष्य केले जात आहे. सायबरडॉस्टच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून यूजर्स सेफ राहू शकतील.

बरेच कॉल्स हे +92 आणि +01 पासून सुरू होणार्‍या नंबरवरून येतात.
फसवणूकीच्या हेतूने बहुतेक कॉल +92 पासून सुरू होणार्‍या नंबरवरून येतात. अशा नंबरवरून सामान्य व्हॉईस कॉल व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉलही यूजर्स साठी केले जात आहेत.

अशा कॉल्सचा हेतू यूजर्सची वैयक्तिक तसेच संवेदनशील माहिती चोरणे हा आहे आणि कॉलर विक्टिमला अडकवून अशी माहिती चोरतो. या व्यतिरिक्त बर्‍याच यूजर्सकडे +01 पासून सुरू होणार्‍या नंबरवरुन देखील कॉल्स आलेले आहेत. अशा कॉल्स विषयी सावधगिरी बाळगा आणि फोनवर कोणाबरोबरही कधीही आपल्या बँकिंग डीटेल्स शेअर करू नका.

लकी ड्रॉ किंवा लॉटरीचे आमिष दिले जाते
या कॉल्स दरम्यान, लोकांच्या बँक खाते क्रमांकापासून डेबिट कार्डच्या डीटेल्स पर्यंतची माहिती चोरी केली जाते. यासाठी त्यांना लॉटरी किंवा लकी ड्रॉमध्ये नाव जिंकण्यासारखे आमिष दाखविले जाते आणि त्या बदल्यात बँकिंग डीटेल्स मागितले जाते. यावेळी त्यांच्याकडून असे सांगितले जाते की आपण जिंकलेले पैसे तुमच्या खात्यावर पाठविले जातील. फ्रॉड करणारी व्यक्ती विक्टिमला एखाद्या मोठ्या कंपनीचे नाव घेऊन त्याची सेवा वास्तविक असल्याचे आश्वासन देते की जेणेकरून ते त्यामध्ये गुंतले जाऊ शकतील.

चुकून असे कोड शेअर करू नका
त्यांना कॉलरच्या वतीने QR कोड किंवा बार कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. तेव्हा चुकूनही असे कोड स्कॅन करु नका. फ्रॉड असे कॉल्स एकापेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या नंबरवरुन देखील करतात