बीड

दिलासा;आज 52 कोरोना मुक्तांना मिळणार डिस्चार्ज

बीड जिल्ह्यात रुग्ण वाढीची संख्या अधिक असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे आज 52 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे

बीड जिल्ह्यात 2137 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये 856 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या 1229 रुग्ण उपचार घेत असून आज 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचीअँटिजेंन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये आढळून आलेल्या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत लक्षणें असणाऱ्या या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे याचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे आजपासून दिनांक 21 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवस जिल्ह्यातील सहा शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे कोरोना ची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी आता तरी सूचनांचे पालन करावे आणि कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी