पेन्शन धारकांना खुशखबर; घरबसल्या SBI च्या या सुविधा मिळणार
नवी दिल्ली /वृत्त संस्था
ही सुविधा विशेषकरून पेन्शन अकाऊंट होल्डर्ससाठी आहे. एसबीआयने म्हटले आहे की, हे ऑपरेट करणे खुप सोपे आहे. यातून 54 लाख पेंन्शनर्सला फायदा मिळेल. एसबीआय पेन्शन पेमेंट करणारी देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँक सीनियर सिटीझन्सला चांगली सर्व्हिस देते.
बँकेचा केंद्र सरकारच्या एजन्सीज जसे की, रेल्वे, डिफेन्स, पोस्ट, टेलीकॉम आणि सिव्हिल डिपार्टमेंटशी करार आहे. अनेक राज्य सरकारचे विभाग आणि दूसर्या स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्यांची पेन्शन सुद्धा याच बँकेत प्रोसेस होते.
असे रजिस्टर करा
1 सर्व प्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pensionseva.sbi/ वर जावे लागेल.
2 प्रथम 5 कॅरेक्टरचा यूजर आयडी बनवावा लागेल. यानंतर आपला पेन्शन अकाऊंट नंबर एंटर करावा लागेल. डेट ऑफ बर्थ नोंदवा.
3 पेन्शनचे पेमेंट करणार्या बँकेचा ब्रँच कोड टाका. ब्रँचमध्ये जो रजिस्टर्ड मेल आय डी दिला आहे तो नोंदवा.
4 आता नवा पासवर्ड टाकून तो सेव्ह ठेवा.
5 अशाप्रकारे या साईटवर अकाऊंट उघडू शकता.
या सुविधा मिळतील
1 कॅलक्युलेशन शीट्स डाऊनलोड करणे
2 पेन्शन स्लिप/फॉर्म 16
3 पेन्शन प्रोफाइलची माहिती
4 लाइफ सार्टिफिकेट स्टेटस
5 ट्रांजक्शन डिटेल