देशनवी दिल्ली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनादेखील करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यानं करोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीची आर्मी रुग्णालयात ब्रेन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या  करण्यात आली. परंतु, शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Former Pres Pranab Mukherjee was admitted to Delhi’s Army Hospital on 10 Aug in critical condition. He underwent emergency life-saving surgery for a brain clot. Post-surgery he continues to remain critical on ventilatory support. He also tested COVID-19 positive: Army RR Hospital pic.twitter.com/ODwneA6JBG

— ANI (@ANI) August 11, 2020

दरम्यान, करोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे दिली असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे