महाराष्ट्रमुंबई

गुड न्यूज;डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला करोनावरील लस लाँच करणार- पूनावाला

मुंबई, ११ ऑगस्ट : कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.

कोविड-१९ वरील लस प्राप्त करणे व तिच्याशी संबंधित व्यवस्थापनाच्या पंतप्रधान मोदी यांच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांची या लशीवर बारीक नजर आहे. ही लस ऑक्सफोर्ड, कॅनसिनो आणि फिझर यासारख्या जागतिक कंपन्यांकडून चाचणी घेतली जात आहे. या कंपन्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत गेल्या आहेत.
भारतीय लशीच्या चाचण्या या प्रारंभिक टप्प्यावर असल्यामुळे हा टास्क फोर्स जागतिक कंपन्यांकडून या लशी प्राप्त करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे.

दुसरीकडे भारतातीही शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करत आहे. दरम्यान, भारतातील करोना लसीची चाचणी सुरू असून यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले. सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.