देशनवी दिल्ली

आता भारत गॅसचे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा एलपीजी ब्रँड भारत गॅस एलपीजी सिलिंडर ग्राहकांना सिलिंडर बुक करण्यासाठी खूप चांगली सुविधा देत आहे. आता भारत गॅसचे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. बीपीसीएल इंडियन ऑईलनंतर देशातील दुसर्‍या क्रमांकाची राष्ट्रीय तेल विपणन कंपनी आहे. भारत पेट्रोलियमचे 7.1 कोटीहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत.

बीपीसीएलच्या या सुविधेमुळे देशभरातील ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. कंपनीतील ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर बीपीसीएलच्या स्मार्टलाईन क्रमांक 1800224344 वर व्हॉट्सअ‍ॅप बुकिंग करता येणार आहे.
तरुण आणि जुन्या दोन्ही पिढ्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हे खूप लोकप्रिय अ‍ॅप असल्याने बीपीसीएल ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करणे सोपे झाले आहे.
ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून कंपनीच्या व्हाट्सएप नंबर 1800224344 वर ‘ HI’ पाठवावा लागेल आणि त्याच्या मोबाइलवर विविध माहिती दिली जाईल. व्हॉट्सअॅपवरुन बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला एक कन्फर्मेशन मेसेज येतो. एक दुवा देखील आहे, ज्यावर रिफिलसाठी ऑनलाइन पेमेंट केले जाऊ शकते. हे ऑनलाइन पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा अ‍ॅमेझॉन सारख्या इतर पेमेंट अ‍ॅप्सद्वारे केले जाऊ शकते.

तसेच, भारत गॅसचे ग्राहक घरी बसल्या बाजार किंवा वितरण क्षेत्रात सिलिंडरची किंमत जाणून घेऊ शकता. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस चॅनलमध्येही कंपनीने इतर अनेक पर्याय दिले आहेत. यामध्ये रीफिल वितरण स्थिती / वितरण स्थिती, आपत्कालीन संपर्क सुविधा, तक्रार नोंदवणे / अभिप्राय देणे, सिलेंडरची किंमत, सुरक्षा संबंधित व्हिडिओ पहा आणि भाषा बदल पर्यायांचा समावेश आहे. याशिवाय भारत गॅस ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 7710955555 वर मिस कॉल देऊन बुक करू शकतात.