बीड

बीड जिल्ह्यात आज दिवसभरात 230 कोरोना पॉझिटिव्ह

आज सोमवारी दिवसभरात बीड जिल्ह्यात 230 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत यात अँटिजेंन टेस्ट मध्ये 137 रुग्ण बीड शहरात आढळले आहेत

बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 1814 झाला असून आतापर्यंत 714 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे 1814 रुग्णसंख्या असतानाच आज रविवारी अँटिजेंन टेस्टमध्ये 137 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1055 असून यामध्ये 645 हे लक्षणें नसलेली रुग्ण असून रुग्ण सौम्य लक्षण असलेली 319 रुग्ण आहेत तर मध्यम लक्षणे असलेली 58 आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 33 आहे

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मधील अँटिजेंन टेस्टचे 137 रुग्णां सह जिल्ह्यात 230 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
आत्तापर्यंत 25226 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 23412 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.