आज 2665 जणांच्या Antigen तपासणीत 131पॉझिटिव्ह
गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरात व्यापारी दुकानदार भाजी विक्रेते दूध विक्रेते फळ विक्रेते यांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली असून दोन दिवसात म्हणजे पहिल्या दिवशी 86 पॉझिटिव दुसऱ्या दिवशी 137 पॉझिटिव्ह तर आज सोमवारी 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत बीड शहरातील बलभीम महाविद्यालय वैष्णोदेवी पॅलेस राजस्थानी विद्यालय जिल्हा परिषद शाळा अशोक नगर चंपावती विद्यालय या सहा ठिकाणी व्यापाऱ्यांची एंटीजन टेस्ट करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे