बीड

सहा शहरे बंद होणार मग मुलांची प्रवेश प्रक्रिया कशी होणार!

बीड-काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावी वर्गाचे निकाल जाहीर झाले आहेत आता विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश घेणे महत्त्वाचे आहे राज्य शासनाच्या वतीने कालच दिनांक 10 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट या कालावधीत तंत्र शिक्षण विभागाने पॉलिटेक्निक प्रवेश याबरोबरच डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ पंधरा दिवसाचा अवधी मिळणार आहे असे असतानाच बीड जिल्ह्यातील सहा शहर दहा दिवसासाठी बंद करणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मुळे आता विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे काय ? असा प्रश्‍न उपस्थित राहू लागला आहेबीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जिल्ह्यातील सहा शहरांसाठी 10 दिवसाचा लॉक डाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला मात्र हे करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न अनुत्तरितच आहे आज पासून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया साठी प्रयत्न चालू आहे दहावी व बारावीनंतर च्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तंत्र शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणार आहे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे अजूनही काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला मार्क मेमो तहसील कार्यालयातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे मिळवलेले नाहीत ती मिळण्याकरता पालकांची धावपळ सुरू आहे आशा असतानाच दहा दिवस बंदचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला बसू नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेणे महत्त्वाचे आहे