दहा दिवस बंद असणाऱ्या पाच शहरात हे नियम लागू
बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज हि शहरे 10 दिवसांकरिता संपूर्णपणे बंद– जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या जिल्हयात मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळेे आदेश जारी
बीड , दि. ९:–जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची वाढ होऊ नये यासाठी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज हि शहरे दहा दिवसां करिता दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे हे आदेश देण्यात आले असून या कालावधीत पाच शहरांमध्ये
केवळ आदेशात नमूद पुढील सेवा चालू राहणार आहे
i) दूध विक्री घरपोच सकाळी 07.00 वा पासून ते सकाळी 09.00 वा पर्यंतच करता येईल
ii) खाजगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने (सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दिनांक 11/08/2020 रोजी पर्यंत खरेदी करुन घ्यावीत)
iii) माध्यमे
iv) घरगुती गॅस सिलेंडर सेवा (संबंधित एजन्सी धारकांनी आपले एजन्सी चा गणवेश परिधान करावा व सोबत आपले ओळखपत्र बाळगावे.
v) जार वाटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोवीड -19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी. तसेच सर्व वाटर सप्लार्यस कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.
vi) मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.
या शहरांमध्ये इतर सर्व सेवा/ फळे-भाज्या इतर सर्व दुकाने/ खाजगी आस्थापना/ बँक/ पेट्रोलपंप, किराणा दुकाने (होलसेल सह)/ कृषी विषयक दुकाने (होलसेलसह)/ शासकीय कार्यालये, (महसूल/ पोलीस/ आरोग्य, ग्रामविकास/ नगरविकास/ विद्युत वगळून) बंद राहतील. या शहरांमधील कोणतीही व्यक्ती अति तातडीच्या वैद्यकीय गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीसाठी घराबाहेर/ शहराबाहेर जाऊ शकणार नाहीत. फक्त ई-पास घेऊनच असा प्रवास करता येईल. या शहरामध्ये सुध्दा केवळ याबाबींसाठीच ई-पास घेऊनच प्रवेश करता येईल. वरील कालावधीनंतर लगेचच शहरांत गर्दी होऊ नये यासाठी विविध प्रकाराची दुकाने वेगवेगळया दिनांकास सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल.
त्यानंतर त्यांना सुरू करता येणार आहे.
सर्व किराणा, खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दि. १० व ११ दुकाने उघडण्यास परवानगी
बीड शहरातील सर्व किराणा, खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दुकाने अॅन्टीजन टेस्ट झालेली नसेल तरीही त्वरीत उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु त्यांनी त्यांची अॅन्टीजेन तपासणी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच करुन घ्यावी. तसेच दिनांक 08 व 09 ऑगस्ट 2020 रोजी ज्या दुकानदारांची अॅन्टीजेन तपासणी झालेली आहे, त्यांनीही दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी दुकाने उघडण्यास हरकत नाही.
ज्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांना कोणतेही लक्षणे नसतील त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन आणि त्यांच्या घरीच विलगीकरण ची व्यवस्था समाधानकारकपणे होऊ शकेल याची खात्री केल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरण (Home Quarantine) ची परवानगी देण्यात येईल, परंतु त्यांनी त्या विषयीचे लेखी शपथपत्र सादर करणे आणि पल्स ऑक्सीमीटर विकत घेऊन दर तासाला स्वत:चे व दुसऱ्या पल्स ऑक्सीमीटरने संपूर्ण परिवाराचे ऑक्सीजनचे प्रमाण तपासत राहणे बंधनकारक करण्यात आले आहे
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीनूसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम 2 अ नूसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1) (3) अन्वये दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश यासह अंमलात राहणार आहेत.
०००००