आजच्या अँटीजेन तपासणीत दिवसभरात 137 पॉझिटिव्ह
कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी कालपासून बीड शहरात सहा केंद्रावरून अँटीजेन तपासणी करण्यात येत असून या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी, व्यवसायिक, त्यांचे कर्मचारी, दूध, फळभाजी विक्रेते येत आहेत. आज दि. 9 ऑगस्ट च्या दिवसभरात सहा केंद्रांवर 3170 जणांच्या अँटीजेन तपासण्या झाल्या असून यामध्ये 137 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळून आले आहेत.
या सर्व रुग्णांना आता विलगिकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत