कुटे ग्रुप तिरुमला ऑईलच्या वतीने 50 क्विंटल धान्य
जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते जीओ जिंदगी कडे सुपूर्द
बीड / प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात कुटे ग्रुप तिरुमला ऑईल नागरिकांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. जिओ जिंदगीच्या वतीने सुरू असलेल्या अन्नदान महायज्ञात तिरूमला ऑईलच्या वतीने पन्नास क्विंटल धान्य आणि अडीशे किलो तिरूमला खाद्यतेल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
कोरोनाच्या संकटात सुरुवातीपासूनच कुटे ग्रुप तिरूमला ऑईलच्या एम.डी. सौ. अर्चना सुरेश कुटे, आर्यन सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी हे सातत्याने मदतीसाठी सरसावले असून यापूर्वी 8000 कामगारांना तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 10 लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाख असा 20 लाखांचा मदत निधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अन्नदानासाठी कुटे ग्रुपने मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शनिवारी जिओ जिंदगीसाठी मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच कु़टे ग्रुप तिरूमला ऑईलने सामाजिक बांधिलकी जोपासत पन्नास क्विंटल गहू आणि अडीचशे किलो तिरूमला खाद्यतेल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्याकडे राजकुुमारआपेट, रवी तलबे यांनी सुपूर्द केले. यावेळी आदींसह जिओ जिंदगीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तिरुमला अन्नपूर्णा ठरली – जीओ जिंदगी
जिल्हाधिकारी यांच्या आवाहना नंतर कुटे यांनी ५० क्विन्तल गहू देऊन मोठी मदत केली आहे . गरिबांना भाकरी देण्याच्या मोहिमेत हि दिलेली मदत म्हणजे यज्ञ आहे . शहरात कुणाला देखील उपाशी राहू देणार नाहीत , सदरील गहू व तेल ग्रामीण भागात वितरीत करून त्याच्या पोळ्या शहरात आम्ही देणार असल्याचे जीओ जिंदगी कडून सांगितले आहे