बीडच्या पंचरत्नांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.07 (प्रतिनिधी)ः- ज्ञान क्षेत्राच्या परिघामध्ये जात-पात, धर्म असा कुठलाही भेदभाव नाही. माणसाची चिकाटी आणि जिद्द असेल तर कुठलेही ध्येय साध्य होते. गणवत्तेच्या क्षेत्रात आपण कमी नाहीत हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे,बीडच्या पंचरत्नांनी शिक्षणाच्या बाबतीत जिल्ह्याचे मागासलेपण पुसून टाकले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
केंद्रिय लोकसेवा आयोग – UPSC परिक्षेत बीड जिल्हातील 5 जणांनी यश संपादन केले.आज या पंचरत्नांचा सत्कार सोहळा नगर परिषद बीड,काकू-नाना प्रतिष्ठान,आदर्श शिक्षण संस्था,नवगण शिक्षण संस्था बीड यांच्या वतीने मा.मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशातुन 22 वा राज्यातुन दुसरा क्रमांक आलेले मंदार पत्की तसेच डॉ.प्रसन्न लोध यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.बाकीचे अन्य तीन जण कंटेनमेंट झोन मध्ये असल्याकारणाने उपस्थित राहु शकले नाही माञ त्यांनाही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कालिदास (नाना)थिगळे,जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे,सचिन मुळूक,दिनकर कदम,विलास बडगे,अरुण डाके,डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर,वैजिनाथ तांदळे,गणपत डोईफोडे,सुनिल सुरवसे,परमेश्वर सातपुते,संपादक अजित वरपे,डॉ.सतिष साळुंके,डॉ.अरुण भस्मे,डॉ हंगे,नागेष तांबारे,विठ्ठल गुजर,विकास यादव,जयदत्त थोटे,विशाल मोरे यांच्यासह यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य,पञकार मंडळी आदि.उपस्थित होते
पुढे बोलताना लोकनेते जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन अटकेपार झेंडा फडकविला. यशवंत, किर्तीवंत भूमिपुत्राच्या सत्काराचे आयोजन केले. जिल्ह्याची उंची वाढवणारा हा कार्यक्रम आहे, स्पर्धा हा जिवनाचा अविभाज्य अंग आहे. रस्त्यातील स्पीड ब्रेकर पार करीत असताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. बीड जिल्ह्याची पार्श्वभूमि वारकरी सांप्रदाय, कष्टाची परंपरा सांभाळणारी आहे. जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविलेला आहे. जिल्ह्यातील 8 विद्यार्थी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहतात. अनेक विद्यार्थी जिल्ह्याबाहेर आय.पी.एस., आय.ए.एस. अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 829 मुले पास झाली त्यात मराठवाड्यातून 15 मुले उत्तीर्ण झाली यात जिल्ह्यातील 5 मुलांचा समावेश आहे. गुणवत्तेच्या बाबतीत आपणही कमी नाहीत हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. वारसा हक्काने संपत्ती मिळते परंतू ज्ञान वारसा हक्काने मिळत नाही तर सरस्वतीची खडतर तपश्चर्या केल्याने ज्ञान मिळते. जयंत पत्की यांचे चिरंजीव मंदार पत्की याने देशात 22 वा तर राज्यात 2 रा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो. जिल्ह्यातील 5 विद्यार्थ्यांनी या परिक्षेत यश मिळवून जिल्ह्याचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. गुणवत्ता हा परवनीचा शब्द आहे जो स्पर्धेत टिकेल तोच यशस्वी होईल. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बाहेर ठिकाणी जाऊन आपले भविष्य घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. आता औरंगाबाद आणि बीडसारख्या ठिकाणी सुध्दा विद्यार्थी विविध परिक्षेत यश संपादन करीत आहेत असे ते म्हणाले. तसेच अॅड.कालिदास थिगळे, मंदार पत्की, डॉ.प्रसन्न लोध यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आर.टी.गर्जे यांनी तर सुत्रसंचलन सुरेश साळुंके यांनी केले. शेवटी दत्तात्रय नेटके यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आला.