बीड

बीड जिल्ह्यात आजही 124 कोरोना पॉझिटिव्ह

आज दि 7 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 124 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे,आता अँटिजेन टेस्ट मध्ये देखील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत,प्रशासनाने आता शहरातील व्यापारी व तिथे काम करणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे न कळत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोक यामुळे वेळेत उपचार घेऊ शकतील व इतरांनाही सुरक्षित ठेऊ शकतील,
जिल्ह्याचा एकूण आकडा आता 1141 झाला असून सध्या 528 रुग्णांना उपचार सुरू आहेत,तर 574 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *