बीड

बीड जिल्ह्यात आज कोरोनाचा उच्यांक 108 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात रुग्णवाढीचा आकडा 1033 असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 537 आहे, हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आजच्या अहवालात 108 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यात बुधवार 5 ओगस्ट रोजी पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल 108 कोरोनाबाधीत रूग्ण निष्पन्न झाले आहेत. यात सर्वाधिक 35 रूग्ण गेवराई तालुक्यातील आहेत. बुधवारी दिवसभरात आरोग्य विभागाने केलेल्या रॅपिड अ‍ॅन्टिजेंट टेस्टमध्ये 28 तर तपासणीला पाठवलेल्या स्वॅबमध्ये 7 अशा एकूण 35 रूग्णांचा समावेश आहे. याशिवाय परळी तालुक्यात 29, बीडमध्ये 14, अंबाजोगाई, माजलगाव प्रत्येकी 6 आणि धारूर व पाटोदा तालुक्यात प्रत्येकी 1 तसेच आष्टी तालुक्यात 5 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या 1141 इतकी झाली आहे.

बीड जिल्ह्यात दि 4 रोजी एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1033 असून 272 रुग्ण लक्षणे नसलेली आहेत तर सौम्य लक्षणे असलेली 131जण आहेत,मध्यम लक्षणे असलेली 42 जण आहेत,आज पर्यंत 537 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 461 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज पर्यंत एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे,जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 51.98 आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *