बीड जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना ई-पास देऊ नये
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पत्र
बीड, दि. ४::-बीड जिल्हयात दिनांक १ आॅगस्ट २०२० पासून लॉकडाऊनची मुदत वादविण्यात आली असून त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे
कोवीड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात अनलॉकची अंमलबजावणी केली जात आहे. राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, कामगार इत्यादींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व मा.पोलीस आयुक्त यांचेकडून ई परवाने दिले जातात.
त्यामुळे इतर जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामधून बीड जिल्हयामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या दिनांक ३१ आॅगस्ट २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येवू नयेत. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्यास आधारकार्ड पत्यानुसार परवानगी द्यावी असे नमूद केले आहे
यातून केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा संबंधीच्या व्यक्तींना व वाहनांना सुट दयावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे