मंदार पत्कीच्या यशाने बीड जिल्ह्याची मान उंचावली- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड जिल्ह्यात नवीन पिढी आता दिवसेंदिवस प्रगती करत असून गुणवत्तेच्या बाबतीत बीडच्या तरुणांनी जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रापार केला आहे याने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशातून 22 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे त्याच्या यशामुळे बीड जिल्ह्याची मान आणखी उंचावली आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले मंदार पत्की याचे आणि त्याच्या आई वडिलांचे अभिनंदनही केले आहे
बीड जिल्ह्यातील तरुणांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक कायम ठेवला आहे कला क्रीडा आणि विविध क्षेत्रात चमकणारे बीडचे हे रत्न आहेत, बीड जिल्हा म्हणजे रत्नांची खाण असून मंदार पत्कीच्या रूपाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे महावितरण मध्ये अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले जयंत पत्की यांनी देखील आपल्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे घरातील आई-वडिलांचे संस्कार मंदारच्या कामी आले आहेत मंदार पत्की याने देशात 22 वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले ही कौतुकास्पद बाब आहे अवघ्या 23 व्या वर्षी मिळालेले हे यश त्याला पुढील आयुष्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे त्याच्या यशाने बीड जिल्ह्याची मान आणखी उंचावली असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे
बीडचा डॉ प्रसन्ना लोध आणि अंबाजोगाईचा वैभव वाघमारे यांचेही केले कौतुक
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन अतिशय जिद्दीने आणि कष्टाने यशप्राप्ती करून बीडचा डॉक्टर प्रसन्न लोध याने देखील यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे आई आणि वडिलांच्या कष्टाचे त्याने सोने केले आहे तसेच शिक्षक म्हणून अंबाजोगाई येथे कार्यरत असणारे विकास वाघमारे व त्यांच्या पत्नी आशाताई वाघमारे यांच्या सुपुत्राने देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे जिल्ह्यातून या तीन विद्यार्थ्यांनी बीड चा झेंडा अटकेपार लावला असून तिघांचेही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे