बीड

बीड शहरातील 10 ठिकाणची संचारबंदी शिथिल

जिल्ह्यातील पंधरा ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल

बीड, दि, ३::- बीड शहरातील १०, परळी शहरात १, केज शहरातील १ यासह पाटोदा तालुक्यातील २ व केज तालुक्यातील १ असे एकूण १५ ठिकाणी प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी दिले आहेत.

या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.

बीड शहरातील काळे गल्ली, लोहार गल्ली, शिवनेरी कॉलनी, काळे गल्ली कोरडे गणपती, चंपावती नगर, ऋतुजा अपार्टमेंट, चौधरी कॉम्प्लेक्स, भद्रा मारुती, गणपती मंदिर शाहूनगर व हाफिस गल्ली या १० ठिकाणी, परळी शहरातील गोपानपाळे गल्ली, केज शहर मधील आनंदनगर तसेच पाटोदा तालुक्यातील करंजवन व काकडहिरा व केज तालुक्यातील कळंबअंबा असे जिल्ह्यात एकूण १५ संबंधित परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे व या संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.

बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ आॅगस्ट २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *