बीड जिल्हा कोरोना मुक्तच
बीड /प्रतिनिधी
सुरुवातीपासून बीड जिल्हा हा कोरोना मुक्त आहे राज्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून सम्पूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे,आजही बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉजिटीव्ह रुग्ण आढळला नाही आतापर्यंत 319 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यात 315 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 4 अहवाल प्रतीक्षेत आहेत
कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला जिल्हा प्रशासनाने तेव्हाच बीड जिल्ह्यात कडक लॉक डाऊन पाळण्याचे आवाहन केले त्यास बीडकरांनी देखील उस्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे मात्र परजिल्ह्यातून आणि विदेशातून आलेल्या लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत त्यात
विदेशातून आलेले 118
होम क्वारंटाईन – 0 होम क्वांरटाईनमधून मुक्त -118
परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले- 94
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन- 127एकूण पाठविलेले स्वॅब – 319 एकूण निगेटिव्ह स्वॅब – 315 एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 00 आज पाठविलेले स्वॅब – 23 प्रलंबित रिपोर्ट – 04 आहेत या काळात कारखान्यातून 45294 इतके ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी कळविले आहे