आनंदाची बातमी:आज 42 जण कोरोनामुक्त होणार
बीड-एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनावर मात करून अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ही जिल्हा वाशियांसाठी आनंदाची बातमी आहे काल 15 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर आज 42 जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे
बीड जिल्ह्यातील जनतेसाठी काल रात्री 12.20 वा.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आनंदाची बातमी प्राप्त झाली असून थोडेथोडके नाही तर तब्बल 453 अहवाल निगेटिव्ह निगेटिव्ह आले असून जे लोकं विनाकारण काळजी न घेता बाहेर फीरत आहेत त्यांना कोरोना पॉझीटीव्ह होण्याचा धोका निर्माण होत आहे..
आणि विशेष म्हणजे लक्षण जाणवल्यानंतर लगेच दवाखान्यात गेलेल्यांना तीन दिवसातच तर काहींना आठ दिवसात बरे वाटत आहे.
त्यामुळे जनतेने घाबरून न जाता फक्त आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य व्यवस्थापनाने केले आहे.
दररोज जवळपास पाचशे लोकं निगेटिव्ह येत असल्यामुळे जिल्ह्यात लोकांमध्ये भिती कमी होत असल्याचे दिसत आहे.
याकडे पण लक्ष देणे गरजेचे
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होतो तो केवळ कोरोना झालेलाच असतो असे नाही त्या रुग्णाला इतर आजार देखील असतात त्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र कोरोना रुग्ण म्हणून इतर आजार तपासणीला कोणताही डॉक्टर येत नाही अश्या तक्रारी येत आहेत
रुग्णांना उपचार सुरू असताना पोटभर जेवणाची गरज आहे ठराविक जेवण दिल्यानंतर तेच खायचे आणि गप्प बसायचे असेही होत असल्याचे सांगण्यात आले
इतर आजार असणाऱ्या रुग्णांना कोणत्याही ऑक्सिजनची गरज लागू शकते तशी यंत्रणा सज्ज हवी
कोविड सेंटर मध्ये कर्मचारी वाढवणे गरजेचे
रुग्ण दगावणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे
रुग्णांच्या मनात भीती असते तिथे त्यांना मानसिक आधाराची गरज आहे