बीडमध्ये कोरोनावर उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू
कोरोना वर उपचार घेत असलेल्या एका 73 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा उपचार घेत असताना आज बीड येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे गेल्या चार महिन्यात त्यांनी कधी घराचा उंबरा ही ओलांडला नाही मात्र घरातच असताना बाथरूम मध्ये पडल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव निघाली गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा रुग्णालयात कोविंड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते काल अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे व्हेडीलेटरही लावण्यात आले होते याबरोबरच इतर देखील त्यांना होते या महिलेला रक्तदाब आणि थायरॉईड हा देखील आजार होता आज सायंकाळी त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे जिल्हा रुग्णालयात मृत्यूची नोंद संख्या आता 33 झाली आहे