खुशखबर:कपात केलेला पगार ऑगस्ट महिन्यांत मिळणार
मुंबई, 28 जुलै: शासकीय कर्माचाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. ती, म्हणजे कोरोनामुळे मार्च महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात आलेली रक्कम त्यांना लवकरच मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारनं आदेश संबंधित विभागांना आदेश जारी केले आहेत. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पगारात कपात करण्यात आलेली रक्कम द्यावी, असं आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे.कोरोना संकाटमुळे आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचारी पगार कपात केली होती. आता कपात केलेला पगार ऑगस्ट महिन्यांत देण्याचे आदेश काढले आहेत.