जिल्ह्यात 50 टक्के रुग्ण बरे झाले:आज 34 पॉझिटिव्हची वाढ
बीड जिल्ह्यात आज तब्बल 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बीड शहरात 11 तर परळी शहरात पुन्हा दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आज रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हाभरातून आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तितकेच आहे सध्या 249 रुग्ण उपचार घेत आहेत तर 264 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,नागरिक विनाकारण भीती पोटी बाहेर गावी उपचार करून घेत आहेत व लाखो रुपये वाया घालवत आहेत,शासनाच्या सर्व सुविधा बीड जिल्ह्यात असताना केवळ भीतीमुळे बाहेर जाऊन उपचार घेणारांची संख्या तितकीच आहे
बीड जिल्ह्यात 533 कोरोना बाधीत संख्या आहे यात 20 जण मयत आहेत व बाहेर जिल्ह्यात 4 मयत आहेत ते बाधीत निघाले असले तरी त्यांना अन्य आजार होते असे निदर्शनास आले आहे,
आजच्या स्थितीत बीडमध्ये 138,अंबाजोगाई मध्ये 100,औरंगाबाद 9,व पुणे येथे 2 रुग्ण उपचार घेत आहेत
जिल्ह्यात 138 ठिकाणी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे,जिथे रुग्ण संख्या कमी आढळून येते तो भाग पुन्हा शिथिल केला जातो
आजही उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 238 जणांना सौम्य लक्षणे आहेत,तर मध्यम लक्षणे असलेली 5 आणि गंभीर लक्षणे असलेली 6 रुग्ण आहेत
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने रविवारी नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.