बीड, आणि गेवराई शहरातील काही ठिकाणी संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड, दि. २१ :– बीड शहरातील चंपावती नगर आणि गेवराई शहरातील बोर्डे गल्ली या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड शहरातील चंपावती नगर येथे विलास बाबासाहेब गोरे यांचे घर ते माणिक मुक्ताराम दुनघव यांच्या घरापर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे
गेवराई शहरातील बोर्डे गल्ली येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असल्याने गेवराई शहरातील बोरडे गल्ली येथील सुमंतराव मुळे यांचे घर ते सुनील मुळे यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वरील या सर्व ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तीनही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.