बीड शहरातील आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू दिवसभरात कोरोनाचे तीन बळी
बीड
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे सोमवारी दिवसभरात तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची मृत्यूची संख्या आता 17 झाली आहे
बीड जिल्ह्यात कोरोना मुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे आतापर्यंत एकूण 350 च्या आसपास कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे बीड जिल्ह्यात सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेवराई तालुक्यात एक परळीतील शिरसाळा येथील शिक्षक औरंगाबाद येथे उपचार घेताना मृत्यू पावले तर आज सायंकाळी बीड शहरातील बार्शी नाका भागातील एका वृद्ध महिलेचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे दिवसभरात तीन बळी गेल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे